Ghodemukh

Ayurvedic Resort Goa

सावंतवाडीची माहिती

सावंतवाडीचं सौंदर्य वर्णन करायला शब्द नक्कीच कमी पडतील.
पृथ्वीवरील स्वर्गाचं मॉडेल असंही सावंतवाडीचं वर्णन करता येईल.
सावंतवाडीच हे लघुदर्शन करवून तुम्हाला मी एकच गोष्ट सांगू इच्छितो ... येवा हि वाडी आपलीच आसा.
: Ghodemukh

महाराष्ट्र आणि गोवा यां दोन राज्यांच्या सीमेवर वसलेलं एक गोंडस शहर. अमाप निसर्गसौंदर्याने नटलेल्या काही मोजक्या आणि ऐतिहासिक शहरांमध्ये सावंतवाडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. सावंतवाडीचं पूर्वाश्रमीचं नाव सुंदरवाडी असं होतं. त्यानंतर इथल्या संस्थानिकांच्या नावानुसार या शहराचे सावंतवाडी असे नामकरण करण्यात आले. सावंतवाडीचं निसर्गवैभव पाहता आजही सुंदरवाडी या नावाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

Ayurvedic-Resort-Goa-sawantwadi-1

मोती तलाव

कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र.निसर्गाची अद्भुत अदाकारी म्हणजे निलवर्णी समुद्र , जी कोकणची शान आहे. पण कोकणचा महत्त्वाचा घटक असूनही सावंतवाडी मध्ये समुद्र नाही. सावंतवाडी शहरालाच काय तालुक्यात देखील समुद्र किनारा नाही पण समुद्राच्या अभावामुळे शहराच्या लौकिकात जराही उणीव भासत नाही. समुद्र नसला तरीही समुद्रास तोडीस तोड असा मोती तलाव आपल्या सावंतवाडीमध्येच आहे. सावंतवाडीचं धडधडंतं हृदय अशी मोती तलावाची ओळख जगभर प्रसिद्ध आहे. संस्थानकाळात निर्मिलेल्या या तलावाने केवळ आपल्या अस्तित्वाने सावंतवाडीची वेगळीच अस्मिता निर्माण केली आहे. सावंतवाडीकर सातासमुद्रापार कुठेही असला तरी मोती तलाव हा त्याला घरातील सदस्यांइतकाच आठवत राहतो.

तलावाशेजारी असलेला दिमाखदार राजवाडा म्हणजे सावंतवाडीच्या शिरपेचातील मानाचा तुरा. जुन्या मुंबई-गोवा महामार्गालगत असलेला हा राजवाडा सावंतवाडीची आन-बान-शान समजला जातो. आपल्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार असलेला हा सावंत-भोसल्यांचा ऐतिहासिक राजवाडा. शिवछत्रपतींचं स्वराज्य ज्या वास्तूनी याची देही याची डोळा अनुभवलंय त्या मोजक्याच वास्तू मध्ये या राजवाड्याची गणना होते. या ऐटदार राजवाड्यामध्ये श्री देव पाटेकराचं जागृत देवस्थान देखील आहे. प्रचंड देखणा अन् रुबाबदार असलेला हा राजवाडा नागरीकांसमवेत अनेक देशी-विदेशी पर्यटकांनाही गेली कित्येक वर्षे भुरळ घालतोय. हल्ली तर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक बड्या निर्मात्यांनी सावंतवाडी आणि सावंतवाडीचा राजवाडा यांनाच चित्रीकरणासाठी प्राधान्य दिलंय.
सावंतवाडी म्हणजे इतर शहरांप्रमाणे एक साधं आणि छोटसं शहर. हाच साधेपणा इथल्या लोकांमध्येही सहज आढळून येतो. विविध ऐतिहासिक वास्तू , देवस्थाने इत्यादिनी सजलेला स्वर्गीय प्रदेश म्हणजे आपली सावंतवाडी. इथे येणारा कुणीही असो वा कुठलाही असो आल्यानंतर त्या व्यक्तीला आपलेपण हे जाणवणारच आणि जाताना ती व्यक्ती सावंतवाडीला "आपलं" मानणारच.

Tired of corporate Routine??
Just visit "Ayurvedic Resort" Near Goa.
HEAL yourself in the best of nature, with panchkarma and blessings of Shiva (Ghodemukh).
For more information Contact-Us
Ajit: +91 9820621021

Ayurvedic Resort Goa

सावंतवाडीची माहिती

तुमचं मत मांडा

If you are looking to build your next (or first) mobile app and need help with one or more of these steps, you’re in luck! The moPharma Group welcomes app owners at any stage in this process. Whether you are a startup or Fortune 50 company, we have the team and knowledge needed to deliver a fantastic mobile app. Please don’t hesitate to today.

Panchakarma Treatments

Article By : Ajit Shirodkar

Ayurvedic Resort Goa

receive a free guide [.pdf] to:- Project Management Certification... along with the subscription

Read Also

How to make your company website based on bootstrap framework...