श्री स्वामी समर्थ

स्वामींची महती जास्तीत जास्तं शेअर करा

श्री स्वामी समर्थ महाराजांचे (अक्कलकोट) स्वरूपदर्शन

स्वामींना "माझा हात पकडा" असे कधीच सांगायची वेळ येत नाही.
जर आपली त्यांच्या चरणाशी "संपूर्ण शरणागती"असेल,
म्हणजेच “जे जे घडते ती ती स्वामींची इच्छा आहे” असे समजून "चांगल्या / वाईटा बद्दल, काहीच वाटेनासे होते.”
त्या वेळेपासून तुमची जबाबदारी, संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते.
।। श्री स्वामी समर्थ ।।

: Ghodemukh

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकातील श्री दत्तप्रभूंचा कलियुगतिल तृतीय अवतार मानले जातात. दत्तगुरूंच्या द्वितीय अवतारातील श्री नृसिंहसरस्वती स्वामी आपले अवतारकार्य संपवून कर्दळी वनात लुप्त झाले. आणी त्याच कर्दळी वनातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली हे पाहून लाकूडतोड्या भयभीत झाला.

इतक्यात क्षणातच दिव्य प्रकाश पडून त्या लाकूडतोड्या समोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने त्या लाकूडतोड्याला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी लाकूडतोड्याला अभय व आशीर्वाद दिले. आणी तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी तेथून बाहेर पडले.

विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.

Ayurvedic-Resort-Goa-swam

इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे सर्व विश्वाला देदीप्यमान असे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील.

स्वामी म्हणजेच भक्तांची साक्षात माऊलीच. भक्तांना संकटाच्या खोल दरीतून बाहेर काढून, भयाचे पाश तोडून भक्ताच्या मायेपोटी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे स्वामी माऊली सदैव हृदयात स्थित असतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी.

म्हणूनच त्यांच्या नामजपाने दुःखाचे निवारण होऊन इच्छित फलप्राप्ती होते.

श्री स्वामी समर्थांच्या गोष्टी

1. वासुदेव बळवंत फडके.

स्वामी अक्कलकोटला आले तेव्हा देशात १८५७ चा लढा सुरू होता.अनेक क्रांतिकारक ब्रिटीशांविरुद्ध लढा देत होते. त्यात एक होते वासुदेव बळवंत फडके. त्यांनी ब्रिटीशांची सत्ता उलथवून लावण्याचा विडा उचलला होता. त्यांनी ठरवले की अक्कलकोट ला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे.

ते अक्कलकोट ला जाऊन पोहचले. त्यांनी महाराजांना गुप्त रीतीने आपला हेतू सांगितला. पण महाराजांनी त्यांच्या मनाप्रमाणे करण्यास आज्ञा दिली नाही. पुढे पुन्हा काही दिवसांनी ते तलवार घेऊन महाराजांच्या दर्शनास आले. त्यांनी असा संकल्प केला की महाराजांनी ही तलवार आपल्या हातात दिली, तर सर्वत्र आपला जय होईल. परंतु महाराज भूतभविष्य जाणणारे. त्यांनी एका सेवकर्‍यास बोलावून, “तलवार नेऊन तरटीच्या झाडावर ठेव.” असे संगितले. वासुदेव फडके निराश होऊन आपली तलवार घेऊन निघून गेले. महाराजांची आज्ञा मानली नसल्यामुळे त्यांना जय मिळाला नाही.

यावरून असे लक्षात येते की, महाराजांनी ‘नको’ म्हणून संगीतलेली गोष्ट केली असता त्यात यश यावयाचे नाही.


बसता ऊठता चालता बोलता मुखी असे स्वामी समर्थाचे नांम ।
कुणीही आडवले तरी धाऊन स्वामी करतील त्याचे काम ।
स्वामी चरणी ज्याची श्रध्दा त्यास काय ऊणे ।
।। श्री स्वामी समर्थ ।।
।। जय जय स्वामी समर्थ ।।

2. कोळ्याची गोष्ट

मुंबई जवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता. त्याचा गलबतचा व्यापार होता. तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे. वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोट ला जायचा. काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मन:पूर्वक सेवा करायचा. समर्थ हे परब्रमहाचे मूर्त रूप आहे हे लक्षण कोळ्याला ठाऊक झाले होते. कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे. अशा काठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा. त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे. समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पहायचा. त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा. स्वामी आपल्यासोबत आहेत आणि जहाजाला काहीही होणार नाही अशी त्याला खात्री असायची.

एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोएसाट्याचा वारा सुटला. समुद्रात भयंकर तूफान आले. जहाजात पाणी शिरून ते बुडू लागले. ते पाहून लक्ष्मण कोळी आणि त्याच्या सोबत असलेले खलाशी खूप घाबरले. लक्ष्मणाचे ही धैर्य सुटले. त्याच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. त्याने स्वामींचे स्मरण केले. तो आर्ततेने स्वामींचा धावा करू लागला, आणि म्हणाला, “हे अक्कलकोट निवासी, श्री स्वामी सामर्था, हे गुरूराया मायबापा, ह्या त्रैलोक्यात एक तुमच्यावाचून कोणी साह्य करणारा नाही, माझ्यावर कृपा करा. तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाज्यापर्यंत पोहचले आहे, हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे.”

कोळ्याचे हे आर्त स्वर स्वामींच्या कानावर आले. त्यावेळी स्वामी एका भक्ताच्या घरी पलंगावर बसले होते. ते एकदम खडबडून उठले. त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून, आवेशाने ‘हुं हुं हुं!’ असे म्हणत वर उचलला. तोंडाने “लक्ष्मण काळजी करू नकोस, भोवरा खूप खोल आहे. तुझ्या नाकातोंडात पाणी गेले आहे,” असे काहीतरी बोलू लागले. तेथे उपस्थितांना काही कळेना. इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला, आणि म्हणाले, “लक्ष्मणा सुटलास बाबा.”

त्याक्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते. हा काय चमत्कार आहे हे कोणाच्याही लक्षात आले नाही. पण आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांसोबत अक्कलकोटास स्वामींच्या दर्शनाला आला. त्याने त्यांच्या चरणांवर अश्रुंचा अभिषेक घातला. त्यांना नैवेद्य व दक्षिणा दिली. तेव्हा सर्वांना स्वामींच्या ह्या चमत्कारच उलगडा झाला.


3. आज्ञा मानली पर्जन्ये !

श्री स्वामी समर्थ एकदा सेवेकरी मंडळींना घेऊन एलमिळी गावी गेले होते. तेथून परत येताना मुसळधार पाऊस सुरू झाला. सगळे सेवेकरी मंडळी भिजून चिंब झाली होती. गुडघाभर पाण्यातून वाट काढत सर्व मंडळी दर्ग्याजवळील आश्रयास गेली. थंडीमूळे सर्व कुडकुड्त होते. त्यातच एकही गाव जवळपास नसल्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था झाली नाही. तेव्हा मंडळी महाराजांना म्हणाली, "महाराज, या पावसामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोठेही कोरडी जागा उरली नाही. तेव्हा काहीतरी मार्ग काढा." तेव्हा श्री स्वामी म्हणाले, "तुम्ही पर्जन्याला आमची जागा सोडून वर्षाव करायला सांगा."

तेव्हा सर्व सेवेकरी मंडळींनी तसे सांगताच पर्जन्याने आज्ञा पाळली आणि श्रींचे स्थान सोडून इतरत्र वर्षाव करू लागला.

श्री स्वामी समर्थ

स्वामींची महती जास्तीत जास्तं शेअर करा
Tired of corporate Routine??
Just visit "Ayurvedic Resort" Near Goa.
HEAL yourself in the best of nature, with panchkarma and blessings of Shiva (Ghodemukh).
For more information Contact-Us
Ajit: +91 9820621021

Ayurvedic Resort Goa

If you are looking to build your next (or first) mobile app and need help with one or more of these steps, you’re in luck! The moPharma Group welcomes app owners at any stage in this process. Whether you are a startup or Fortune 50 company, we have the team and knowledge needed to deliver a fantastic mobile app. Please don’t hesitate to today.

Panchakarma Treatments


Ayurvedic Resort Goa

Article By : Ajit Shirodkar

Ayurvedic Resort Goa

receive a free guide [.pdf] to:- Project Management Certification... along with the subscription

Read Also

How to make your company website based on bootstrap framework...