Ghodemukh

Ayurvedic Resort Goa

घोडेमुख आख्यायिका आणि परंपरा

सावंतवाडी संस्थानातील व वेंगुर्ला तालुक्या अंतर्गत येणारे पेंडूर गाव (पूर्वी मातोंड पण आता मातोंड पासून वेगळे झालेले), प्राचीन परंपरा लाभलेले गाव. पेंडूर गावाचे ग्रामदैवत व श्री शंकराचे रूप अशी ख्याती असलेले, जागृत म्हणून प्रसिद्धी पावलेले श्री देव घोडेमुख.
घोडेमुख जत्रा 2018, 12 डिसेंबर : Ghodemukh

Ghodemukh mandir, Matond

सावंतवाडी संस्थानातील व वेंगुर्ला तालुक्या अंतर्गत येणारे पेंडूर गाव (पूर्वी मातोंड पण आता मातोंड पासून वेगळे झालेले), प्राचीन परंपरा लाभलेले गाव. पेंडूर गावाचे ग्रामदैवत व श्री शंकराचे रूप अशी ख्याती असलेले, जागृत म्हणून प्रसिद्धी पावलेले श्री देव घोडेमुख. या देवस्थानाबद्दल खात्रीलायक अशी माहिती उपलब्ध नसली, तरी या गावात ज्या आख्यायिका ऐकिवात येतात, त्यावरून असे कळते कि एक सत्पुरुष सरदार, जे सावंतवाडी संस्थानात सेवा बजावत असत. ते जेव्हा आपल्या घरी परतत (नक्की कुठचे गाव ती माहती उपलब्ध नाही), तेव्हा न्हावेली गावाची सीमा ओलांडून मातोंड (आताचे पेंडूर), गावात प्रवेश करीत तेव्हा त्यांचा अश्व थबकून उभा राही. काही केल्या पाऊल उचलत नसे .जेव्हा ते त्यावरून पायउतार होत तेव्हा तो चालू लागे . सातत्याने असे घडू लागयावर त्यांनी याबाबत, तेव्हाचे आचार्यगुरु यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांना श्री शंकराच्या ह्या रूपाबद्दल दृष्टांत झाला, आणि तेव्हा श्री घोडेमुख देवाचे लिंग, डोंगर माथ्यावर घनदाट गर्द वनात शोधून त्यांनी तिथेच प्रस्थापित केले. अश्वामुळे या दैवताची प्राप्ती झाली, त्यामुळे या दैवताला घोडमख असे संबोधले गेले . या गावात अश्वावर आरूढ होणे निषिद्ध आहे. इतकेच नाही तर गावातल्या कुणालाही अश्वारूढ होता येत नाही जेणेकरून देवतेचं अपमान होईल . ज्या वनात .... लोकभाषेत जंगलात, श्री घोडेमुखाचे वास्तव्य आहे त्याला "युवराचे रान" असे नाव होते. परंतु श्री घोडेमुख देव स्थापन झाल्यावर, त्याला त्यांच्याच नावे ओळखले जाऊ लागले. जस जसा काळ उलटत गेला, तसतशी देवंस्थानाची कीर्ती सर्वत्र पसरत गेली. गावाच्या परंपरेनुसार पुढे या देवस्थानाचे विधी सुरु झाले .ह्या देवस्थानात होणारी कोंबड्यांची जत्रा प्रसिद्ध आहे.

घोडेमुख जत्रा 2018, 12 डिसेंबर

३६० गावांचा अधिपती म्हणून ख्याती असलेला, व भक्तांच्या हाकेला धावणारा, व नवसाला पावणारा अशी भावकांची श्रद्धा आहे .श्री देव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या प्रतिकृतीचे दान करण्याची प्रथा आहे . असे केल्यास अवयवाला असणारे दुखणे कायमचे थांबते ,अशी भावकांची समजूत आहे . मातोंडच्या देवस्थानाच्या देवदीपावली दिवशी, सातेरी मंदिरात मांजी बसते. यानंतर सलग चार दवस या मंदिरात जागर होत असतो . पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या जत्रौत्सवादिवशी, सकाळी गावकर मंडळी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भुतनाथ व पावणाई या देवांच्या तरंगकाठ्यासह, घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून येतात. या नंतर श्रेदेव क्षेत्रात केळी व नारळाचा नैवेद्य दाखवला जातो. भुतनाथ व पावणाईदेवीला तेथे गोडा उपहार दाखवण्यात येतो. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने, कोंबड्यांचा बाली देण्यासाठी दाखल झालेले भाविक, आपल्या मनोकामना गावकऱ्याद्वारे गाऱ्हाण्याच्या स्वरूपात श्री देव घोडेमुखाकडे मांडतात.त्यानंतर खऱ्या अर्थाने डोंगर उतारावरुनच, कोंबड्यांचा बळी देण्याचा कार्यक्रमाला सुरवात होते . जवळपास 20 ते 25 हजार कोंबड्यांचा बळी जत्रौत्सवात देण्यात येतो . सायंकाळी हा बळी देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर, पावणाई व भुतनाथ अवसारासह खाली येऊन पुन्हा सातेरी मंदिराकडे रवाना होतात. असंख्य भाविकांच्या गर्दीने श्री देव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून जाते . मातोंड आणि पेंडूर नि मळेवाड तर एका बाजूला न्हावेली, या गावांच्या सीमेरच श्री देव घोडेमुखाचे देवस्थान आहे . शिव मार्तंडेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले हे देवस्थान, प्रवेशद्वारापासून 700 मीटर चढून गेल्यावर गेल्यावर डोंगरावर आहे.मंदिराच्या पायथ्याशी भाविकांच्या जत्रौत्सवाचा मोठा जनसागरच लोटतो. सकाळपासूनच मोठा उत्साहात श्रीदेव घोडेमुखाच्या क्षेत्रात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होते .या जत्रौत्सवात सहभागी होण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून चाकरमानीही मुंबई , गोवा ,कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात दाखल होतात.At this Divine surrounding of Shree Dev Ghodemukh, you will get your full Ayurvedic Panchakarma treatment by Ghodemukh,at Ayurvedic Resort Goa.<

More information regarding Shree dev Ghodemukh devasthana will be posted on 13 August 2018, by Ghodemukh, Ayurvedic resort Goa.

Tired of corporate Routine??
Just visit "Ayurvedic Resort" Near Goa.
HEAL yourself in the best of nature, with panchkarma and blessings of Shiva (Ghodemukh).
For more information Contact-Us
Ajit: +91 9820621021

Ayurvedic Resort Goa

तुमचं मत मांडा

If you are looking to build your next (or first) mobile app and need help with one or more of these steps, you’re in luck! The moPharma Group welcomes app owners at any stage in this process. Whether you are a startup or Fortune 50 company, we have the team and knowledge needed to deliver a fantastic mobile app. Please don’t hesitate to today.

Panchakarma Treatments

Ayurvedic Resort Goa

Article By : Ajit Shirodkar

Ayurvedic Resort Goa

receive a free guide [.pdf] to:- Project Management Certification... along with the subscription

Read Also

How to make your company website based on bootstrap framework...